Majha Samvad : काँग्रेसच्या तरुण नेतृत्त्वामध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याचा स्वर : विश्वजित कदम

Share Now To Friends!!

<p>एबीपी माझा वृत्तवाहिनीला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आम्ही आता 15व्या वर्षात पदार्पण करत आहोत. या 14व्या वर्षांच्या प्रवासात तुमची साथ आमच्यासाठी अमुल्य आहे. 14 वर्षांच्या प्रवासात ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. या बदलांना प्रेक्षकांनीही साथ दिली. हा 14 वर्षांचा प्रवास सोपा नव्हता, पण तो केवळ प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाला. या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी माझा संवाद या विशेष मालिकेत.दिवसभर मंथन करणार आहोत.&nbsp;</p>
<p>माझा संवाद या निमित्ताने षी आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याशी संवाद साधला त्यांनी अनेक गोष्टींवर आपलं परखड मतं मांडली.&nbsp;</p>
<p>"राजकीय पक्ष हे वाढावे, त्या-त्या पक्षाच्या नेतृत्त्वाचा, देशाच्या लोकशाही प्रक्रियेतील हा अधिकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या असतात, साधारणपणे 1999 पासून 2014 पर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं. त्या काळात या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या जायच्या. जिल्हा परिषद असो किंवा महापालिकेची निवडणूक असो. यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं समजून घेतात, त्यांना विश्वासात घेतात, त्यानंतर मग निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे या निवडणुका स्वतंत्र लढवल्या जातात. त्यामुळे स्वबळाचा नारा देणं काही गैर नाही." असं विश्वजित कदम म्हणाले. काँग्रेसच्या तरुण नेतृत्त्वामध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याचा स्वर आहे, असं म्हणता येईल का, असं विचारल्यावर ते म्हणाले की, "मी पुन्हा एकदा सांगतो मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलतोय. ज्यावेळी लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा प्रश्न येतो, त्यावेळी हा निर्णय त्या-त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा असतो."</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment