Mehul Choksi : डॉमिनिका कोर्टाची कर्जबुडव्या मेहूल चोकसीच्या प्रत्यार्पणाला स्थगिती

Share Now To Friends!!

Mehul Choksi : डॉमिनिका कोर्टाची कर्जबुडव्या मेहूल चोकसीच्या प्रत्यार्पणाला स्थगिती

पंजाब नॅशनल बँकेची 13500 कोटींची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरेबियन बेटावरुन फरार झाला होता. त्याला  डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. डोमिनिका सरकार मेहुल चोकसीला भारताच्या ताब्यात देण्याऐवजी पुन्हा अँटिगा-बार्बुडा येथे पाठवणार आहे. अँटिगा-बार्बुलाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊनी यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे.

दरम्यान डोमिनिका येथील मेहुल चौक्सीचे वकील मार्श वेन यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, आज सकाळी पोलिस स्टेशनमध्ये मेहुलची भेट झाली. वकिलाच्या म्हणण्यानुसार, अपहरण करुन डोमेनिका येथे आणण्यात आले असा आरोप मेहुलने केला आहे. तसेच आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही त्याने केला आहे. मेहुल चौकसीला दिलासा मिळावा यासाठी त्याचे वकील न्यायालयात अपील दाखल करणार आहेत.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment