Microsoft Windows 11 : डिझाईन आणि स्टार्ट मेन्यू बदललं, ‘हे’ आहेत Windows 11 चे नवीन फीचर्स 

Share Now To Friends!!

Microsoft Windows 11 : तब्बल सहा वर्षांनी मायक्रोसॉफ्टने आपल्या विंडोजमध्ये अपडेट्स करत Windows 11 च्या रुपात नवीन ऑपरेटिंग सिस्टिम लॉन्च केली. या विंडोजमध्ये अनेक नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत. फ्रेश लूक, नवीन थीम, वेगळं स्टार्ट बटन, मायक्रोसॉफ्ट सेंटर आणि बऱ्याच नवीन सुविधा या  Microsoft Windows 11 मध्ये देण्यात आल्या आहेत. 

 

या आधी मायक्रोसॉफ्टमध्ये डाव्या बाजूला असणारा स्टार्ट मेन्यू आता Windows 11 मध्ये मध्यभागी असणार आहे. मायक्रोसॉफ्ट टीम्स या नव्या विंडोजमध्ये जोडण्यात आल्याने व्हिडीओ कॉल्स आणि मेसेज करणे अधिक सोपं होणार आहे. तसेच विंडोज अपडेटची साईजही कमी करण्यात आली असल्याने डाऊनलोड करणं अधिक सुलभ होणार आहे. 

स्टार्ट मेन्यू आता मध्यभागी आणल्याने या विंडोजमधील अॅप्स किंवा इतर फाईल्स या वेगाने सर्च केल्या जाऊ शकतील. तसेच स्टार्ट मेन्यूमधील विजेट्स आता स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. महत्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये मायक्रोसॉफ्ट स्टोअर देण्यात आलं असून त्यावर अनेक अॅप्स उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यामुळे डाऊनलोड करताना सुरक्षितता वाढली आहे. 

Microsoft Windows 11 मधील नवीन फिचर्समुळे आता एका पीसीला दुसऱ्या पीसीशी कनेक्ट करणं सोपं झालं आहे. डॉक आणि अनडॉक फीचर्समुळे प्रो यूजर्सला हाय क्वॉलिटी एक्सपिरियंन्स मिळणार आहे.

नवीन Microsoft Windows 11 मध्ये प्रोसेसर हा 1 GHz चा वापरण्यात आला आहे. त्यामुळे याच्या वेगात वाढ झाली आहे. तसेच यामध्ये 4 GB RAM आणि 64 GB इंटरनल स्टोरेज वापरण्यात आलं आहे. याचा डिस्प्ले हा 9 इंचाचा असून 720p HD Resolution चा वापर करण्यात आला आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment