Moderna : मॉडर्नाची लस डेल्टा व्हेरिएंट विरोधात अधिक प्रभावी, कंपनीचा दावा

Share Now To Friends!!

नवी दिल्ली : अमेरिकन लस मॉडर्ना ही डेल्टा व्हेरिएंटविरोधात शरीरात अॅन्टिबॉडी तयार करत असून ती अधिक प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. डेल्टा हा व्हेरिएंट सुरुवातीला भारतात सापडला असून तो सध्या चिंतेचा विषय झाला आहे. डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील अनेक देशांमध्ये झाला आहे. भारतात नुकतंच या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. 

मॉडर्ना कंपनीच्या वतीनं वेगवेगळ्या व्हेरिएंटची लागण झालेल्या आठ लोकांच्या रक्तगटावर अभ्यास करण्यात आला. या सर्वच व्हेरिएंटविरोधात मॉडर्नाच्या लसीने अॅन्टिबॉडी तयार केल्याचं समोर आलंय. कंपनीच्या वतीनं हा अभ्यास bioRxiv या वेबसाईटवर प्रकाशीत करण्यात आला आहे. 

मॉडर्ना ही फायझरच्या लसीप्रमाण mRNA लस आहे. ही लस आपल्या शरीरात स्पाईक प्रोटिन्स तयार करते, त्यामुळे शरीरात अॅन्टिबॉडी तयार होण्यास मदत होते. हे अॅन्टिबॉडी व्हायरसच्या संपर्कात आलेल्या प्रोटिन्सना ओळखतात आणि त्याच्यावर हल्ला चढवतात. मॉडर्नाची ही लस 18 वर्षांवरील लोकांमध्ये अधिक प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. ही लस कोरोनाच्या विरोधात 94.1 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. 

मॉडर्नाची लस अल्फा, बीटा आणि गॅमा या लसींच्या विरोधात प्रभावी असल्याचं या आधीच कंपनीनं सांगितलं आहे. आता नवीन डेल्टा व्हेरिएंटविरोधातही ही लस प्रभावी असल्याने याचा फायदा अधिक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

भारताच्या औषध महानियंत्रक संस्था  (DCGI) मॉर्डना या अमेरिकेतील औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या कोरोनाविरोधी लसीच्या आप्तकालीन वापराला मंजुरी दिली आहे. अमेरिकेने भारताला कोवॅक्सच्या माध्यमातून मॉर्डनाच्या कोरोना विरोधी लसी देण्याची तयारी दाखवली आहे. मुंबईतील सिप्ला या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून या लसीची आयात करण्यात येणार असून ही लस भारतातील 18 वर्षांवरील नागरिकांना देण्यात येणार आहे.

भारतात या आधी कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या लसींच्या वापराला मंजुरी मिळाली असून आता मॉडर्नाच्या मंजुरीनंतर या लसींची संख्या चार झाली आहे. मॉडर्नाच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्यता दिली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment