Petrol-Diesel Rate : इंधन दरवाढीचा नवा उच्चांक; राज्यातील मोठ्या शहरांत पेट्रोल शंभरीपार

Share Now To Friends!!

<p><strong>मुंबई :</strong>&nbsp;सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मे महिन्यातील ही सोळावी इंधन दरवाढ आहे. आज डिझेलच्या दरात 24 ते 28 पैशांची तर पेट्रोलच्या दरात 28 ते 29 पैशांची वाढ झाली आहे. पुण्यात पहिल्यांदाच पेट्रोलच्या दराने शंभरीपार केली आहे.&nbsp;</p>
<p>मुंबईत पेट्रोलची किंमत 100.47 रुपये आणि डिझेलची किंमत 92.45 रुपये प्रति लिटर आहे. तर सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोल प्रति लिटर 102 रुपये 85 पैसे तर डिझेल प्रति लिटर 93 रुपये 32 पैसे एवढं आहे. तर पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 100.15 रुपये असून डिझेलसाठी प्रति लिटर 90.71 रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 94.23 रुपये तर डिझेलचा दर 85.15 रुपये प्रति लिटर आहे.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment