Pfizer : युरोपमध्ये मिळणार 12 ते 15 वयोगटातील बालकांना लस, Pfizer-BioNTech ला मंजुरी

Share Now To Friends!!

Pfizer : युरोपियन ड्रग रेग्युलेटरने शुक्रवारी युरोपियन युनियमधील देशांतील 12 ते 15 वयोगटातील बालकांना Pfizer-BioNTech ची लस देण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे आता या वयोगटातील बालकांच्या लसीकरणासाठी लवकरच सुरुवात होणार आहे. द गार्डियनच्या एका वृत्तानुसार, जर्मनीने आपल्या देशात जूनपासून या वयोगटातील बालकांचं लसीकरण सुरु होणार असल्याचं जाहीर केलं आहे.  

Pfizer कंपनीने 12 ते 15 वयोगटातील बालकांवर आपल्या लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास गेल्या महिन्यापूर्वीच केला आहे. त्यामध्ये ही लस बालकांवरही प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा दावा Pfizer च्या वतीनं करण्यात आला आहे.

अमेरिकेत लसीकरण सुरु
अमेरिकेतील 12 वर्षावरील बालकांना Pfizer-BioNTech ची कोरोना लस देण्यास अन्न आणि औषधं प्रशासनाकडून (FDA) मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेच्या लसीकरणाच्या कार्यक्रमातील आणि कोरोना विरोधातल्या लढ्यातील हा एक महत्वाचा निर्णय आहे. 

भारतात कधी मंजुरी मिळणार? 
भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार असून त्यामध्ये लहान मुलांना जास्त धोका आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोवॅक्सिन’ लसीच्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला  ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय)  मान्यता दिली आहे. 

भारतातील कोरोनाच्या लसींचा सध्या मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याचं पहायला मिळतंय. त्यातच 18 वर्षाखालील मुलांना कोरोनाची लस देण्यात यावी अशा आशयाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस कधी मिळते हे लवकरच समजेल. 

महत्वाच्या बातम्या : 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment