Pradeep Sharma : कोण आहेत प्रदीप शर्मा ?

Share Now To Friends!!

<p><strong>मुंबई :</strong>&nbsp;एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ताब्यात घेतलं असून आजच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. एनआयने मुंबईतील अंधेरी परिसरातील त्यांच्या घरावर छापे टाकले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली आहे. यादरम्यान प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात आहेत. सीआरपीएफच्या आठ ते दहा कंपन्या इथे तैनात आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर आहेत.</p>
<p>याआधी या प्रकरणात एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी झाली होती. परंतु आता थेट छापा टाकून एनआयएनने झाडाझडती सुरु केली आहे. स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरण हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.</p>
<p>उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर फेब्रुवारी महिन्यात जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारसपणे सोडण्यात आली होती. त्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. प्रदीप शर्मा हे सचिन वाझे यांच्या जवळचे समजले जातात. यानंतर प्रदीप शर्मा यांचीही एनआयएने एप्रिल महिन्यात चौकशी केली होती. काही महिने हे चौकशी थांबली होती. परंतु आज सकाळी एनआयएने त्यांच्या घरावर छापा टाकून त्यांची चौकशी केली.&nbsp;</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment