Pune Fire : आग लागली तेव्हा सर्वजण आपला जीव वाचवून पळत होते; प्रत्यक्षदर्शी सुरक्षा रक्षकाची माहिती

Share Now To Friends!!

Pune Fire :  पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागली त्यावेळी कंपनीत 37 कर्मचारी होते अशी माहिती समोर येत आहे. या कर्मचाऱ्यांपैकी 18 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. पण काहींना मात्र या दुर्घटनेच आपले प्राण गमवावे लागले. 

केंद्र आणि राज्य शासनाकडून या दुर्घनेबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मदतीचा हात देण्यासंबीधी सांगण्यात आलं आहे. या दुर्घटनेबाबत कंपनीचे सुरक्षा रक्षक राजकमल यांनी त्यावेळी नेमकं काय घडलं याची माहिती दिली. 

पिरंगुट येथी SVS कंपनी मध्ये सुरक्षा रक्षक काम करत असणाऱ्या राजमल यांनी आपल्या डोळ्यासमोर ही घटना पहिली. याबाबत सांगताना ते म्हणाले, ‘जेव्हा आग लागली तेव्हा सर्वत्र धूर यायला लागला होता. सगळेजण आपला जीव वाचवून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते. आम्ही देखील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला स्थानिक लोकांनी सुद्धा यामध्ये मला मदत केली.’ राजमल हे 4 तारखेपासून या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामावर येत होते. 

राजकमल यांच्या सांगण्यावरुन आग लागली त्यावेळी इथं नेमकी काय परिस्थिती असेल याचा अंदाज लावता येत आहे. दरम्यान, आज सुप्रिया सुळे आणि दिलीप वळसे पाटील घटनास्थळाला भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

Ghotawade Phata Pune Fire : पुण्याच्या आगीतील मृतकांच्या परिवाराला राज्य सरकारकडून पाच तर केंद्राकडून दोन लाख रुपयांची मदत

पुण्यातील या आग दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तर पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जखमी व्यक्तींना 50,000 रुपये भरपाई देण्यात येणार आहे. 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment