QUAD देशांच्या युद्धसरावात आता फ्रान्सचा सहभाग, चीनसाठी धोक्याची घंटा

Share Now To Friends!!

नवी दिल्ली : इंडो-पॅसिफिक प्रदेश हा मुक्त आणि सुरक्षित राहिला पाहिजे तसेच या प्रदेशातील सर्वांचे समान हितसंबंध जपले पाहिजेत यासाठी हिंदी महासागरात सोमवारपासून क्वाड देशांचा युद्धसराव सुरु झाला आहे. आता या युद्धासरावात फ्रान्सने भाग घेतल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वॉड देशांच्या युद्धसरावात फ्रान्सने भाग घेतल्याने तो चीनसाठी एक इशारा असल्याचं समजण्यात येतंय. 

क्वॉड देशांचा युद्धसराव 5 मार्च ते 7 मार्च असा तीन दिवस चालणार आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनच्या वाढत्या दादागिरीला शह देण्यासाठी हे चार देश एकत्र आले आहेत. त्यामुळे हिंदी महासागरात सुरू असलेला हा युद्धसराव महत्वाचा मानला जातोय. त्यातच आता फ्रान्सचा सहभाग झाल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. या युद्धसरावाला 18 व्या शतकातील फ्रान्सच्या नौदल अधिकारी ‘पेरॉस’ यांचे नाव देण्यात आले आहे. चीन या देशांच्या हालचालीवर बारीक नजर ठेऊन आहे. 

 

भारतीय नौसेनेने या युद्धसरावात INS सातपूडा जहाज आणि P8I लॉंग रेन्ज मेरिटाईम पेट्रोल एयरक्राफ्ट तसेच  INS किल्तान सह भाग घेतला आहे.  

इंडो-पॅसिफिक प्रदेश हा मुक्त आणि सुरक्षितच राहीला पाहिजे असा ठराव मार्च मध्ये झालेल्या क्वॉड देशांच्या पहिल्या बैठकीत करण्यात आला होता. त्या बैठकीत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान सूगा वर्च्युल हे सहभागी झाले होते.

जर आपण सर्व एकत्रित आलो, एकमेकांना सहकार्य केलं तर या प्रदेशातील मूल्ये आणि या प्रदेशाची सुरक्षितता कायम राहील असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. इंडो-पॅसिफिक प्रदेशातील लोकशाही मूल्ये, स्वातंत्र्यता आणि विकासाच्या मुद्द्यावर हे देश एकत्रित येत आहेत असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. क्वॉड गटाकडून इंडो-पॅसिफिक प्रदेशातील एकमेकांच्या हितसंबंधांचे संरक्षण केले जाते.

क्वॉडचा विस्तार होणार का? 
क्वॉडचा विस्तार होऊन तो क्वॉड प्लस गट होणार का असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. आता या गटाच्या युद्धसरावात फ्रान्सचा सहभाग झाल्याने तसे संकेत मिळत असल्याची चर्चा आहे. 

क्वॉड देशांनी वतीने युरोपीयन देश आणि इतर महत्वाच्या देशांशी सहकार्य वाढवावा असाही सूर नेहमी निघतो. परंतू क्वॉड गटाच्या विस्तारावर औपचारिक अशी कोणतीही चर्चा आतापर्यंत झाली नाही. क्वॉड देशांचा गट म्हणजे इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनला देण्यात आलेला एक प्रकारचा शह असल्याचं सांगण्यात येतंय. 

महत्वाच्या बातम्या : 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment