Reservation in Promotion : पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत लवकरच तोडगा निघेल : ऊर्जामंत्री नितीन राऊत

Share Now To Friends!!

मुंबई : पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय उपसमितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सर्वच नेत्यांनी दिली. या बैठकीला महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, केसी पाडवी उपस्थित होते. पदोन्नतमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु सरकारमधील प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसचा या निर्णयाला विरोध आहे.

लवकरच तोडगा निघेल : नितीन राऊत
पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली. याबाबत लवकरच तोडगा निघेल, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. कोर्टाच्या प्रलंबित याचिकेमुळे पेच निर्माण झाला आहे. त्यावर सखोल कायदेशीर अभ्यास केला जाईल, अशी माहिती ऊर्जा राऊत नितीन राऊत यांनी दिली. माझी नाराजी नव्हती. आम्ही हा विषय लावून धरला आहे. तीन पक्षाच सरकार आहे त्यामुळे तीनही पक्षाच्या नेत्याना एकत्रित विचार करावा लागेल, असंही राऊत यांनी सांगितलं.

अजित पवार यांची माहिती
पदोन्नतीमधील आरक्षण विषयावर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करुन दिली.

Source link

Share Now To Friends!!

Leave a Comment