Sameer Gaikwad Suicide : टिकटॉक स्टार समीर गायकवाडची आत्महत्या, सोशल मीडियावर समीरचे लाखो चाहते

Share Now To Friends!!

पुणे : टिकटॉक स्टार अभिनेता समीर गायकवाड याने घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीतील त्याच्या घरात त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास केसनंद रस्त्यावरील मिकासा इमारतीत टिकटॉक स्टार अभिनेता समीर गायकवाड याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत समीरला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. समीरने आत्महत्या का केली, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर समीरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या आत्महत्येमुळे चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment