Sharad Pawar Health | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Share Now To Friends!!

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे 31 तारखेला रुग्णालयात दाखल होणं अपेक्षित होतं. पण, त्यांचं दुखणं वाढल्यामुळं निर्धारित वेळेआधीच त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोटात दुखू लागल्यामुळं रविवारी ते रुग्णालयात गेले होते. जिथं तपासणीनंतर त्यांना 31 मार्चला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता. शरद पवार यांच्यावर 31 मार्च म्हणजेच बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं कळत आहे.

शरद पवार साहेबांना उद्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात येणार होते मात्र आजच पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढच्या तपासण्या व औषधोपचार इथेच होणार असून परिस्थिती बघून शस्त्रक्रियेबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment