Shirdi | शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शन वेळेत बदल, सकाळी 7.15 ते संध्याकाळी 7.45 पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं

Share Now To Friends!!

 शिर्डी : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य  शासनाने 28 मार्च 2021 च्‍या कोवीड- 19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यानुसार आता भाविकांना साई मंदिर दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी 7.15 ते संध्याकाळी 7.45 यावेळेत खुले राहणार आहे. तसेच श्री साईप्रसादालय हे सकाळी 10 ते रात्री 7.30  यावेळेत सुरु राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थान ने दिली आहे. 

14 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य  शासनाच्या आदेशानुसार 16 नोव्हेंबरपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी अटी शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने श्री साईबाबा मंदिरात गर्दी होवू नये म्हणून संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यानुसार रात्री 8 ते सकाळी 7 यावेळेत संपूर्ण राज्यात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे साईभक्तांना दर्शनासाठी श्री साईबाबांचे समाधी मंदिर सकाळी 7.15 ते संध्याकाळी 7.45 यावेळेत खुले राहणार आहे. रात्री 10.30 ला होणारी श्रींची शेजारती आणि पहाटे 4.30 वाजताची काकड आरती नेहमीप्रमाणे होईल. परंतु याकरता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच श्री साईप्रसादालय हे सकाळी 10 ते रात्री 7.30 यावेळेत भाविकांकरीता सुरु असणार आहे.

 गेल्या काही दिवसांपासून साईमंदिर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले होते मात्र आता पुन्हा एकदा नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून साईभक्तांनी या होणा-या बदलाची नोंद घ्यावी व कोवीड -१९ संदर्भातील नियमांचे पालन करुन श्री साईबाबा संस्थानला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment