Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन |  27 जून 2021 रविवार | ABP Majha

Share Now To Friends!!

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन |  27 जून 2021 रविवार | ABP Majha

1. डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहता सोमवारपासून दुपारी चारनंतर महाराष्ट्र बंद, अनेक शहरं आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक

2. राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय, काल 9,812 नवीन रुग्णांची नोंद, कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा हॉटस्पॉटच्या मार्गावर

3. डिसेंबरपर्यंत प्रत्येकाचं लसीकरण करा, पंतप्रधान मोदींचे अधिकाऱ्यांना आदेश, तर महाराष्ट्रात काल सात लाखांहून अधिक लोकांच्या लसीकरणाचा विक्रम
 
4. डेल्टा प्लस अतिधोकादायक, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा तर कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी धोकादायक नसेल, आयसीएमआरचा दावा

5. ‘डीआरडीओ’कडून स्वदेशी ‘पिनाका’ रॉकेटची यशस्वी चाचणी, 45 किमीपर्यंतचे लक्ष्य भेदण्यात यशस्वी

 

6. अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना 1 जुलैपर्यंत ईडी कोठडी, देशमुखांना ईडीचा पुन्हा समन्स, मंगळवारी हजर राहण्याची सूचना

7. मान्सूनमध्ये 10 दिवसांचा खंड, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट, 5 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा हवामान खात्याचा अंदाज

8. कोविडमुळे पालकांचे छत्र हरविलेली मुले, पती गमावलेल्या महिलांना नवी मुंबई महापालिकेचा आर्थिक मदतीचा हात, चार योजना जाहीर 

9. डेक्कन एक्स्प्रेस आता विस्टाडोम कोचसह धावणार, मुंबई-पुणे प्रवासात निसर्गसौंदर्य न्याहाळण्याची संधी

10. श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या बंकरवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, तीन नागरिक जखमी

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment