Tesla नं लाँच केली जगातील सर्वात वेगवान कार, किंमत आणि वेग पाहून जाणून व्हाल अवाक्

Share Now To Friends!!

नवी दिल्ली : इलेक्ट्रीक कारसाठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या टेस्ला या कंपीनीनं जगातील सर्वात वेगवान कार लाँच केली आहे. कंपनीनं Tesla Model S Plaid ला अमेरिकेच्या बाजारात आणलं आहे. आतापर्यंत ही जगातील सर्वात वेगवान कार असल्याचं सांगण्यात येत आहे. हीची किंमत 1,29,990 डॉलर म्हणजेच भारतीय प्रमाणानुसार 95 लाख रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. ही कार, दोन सेकंदांमध्ये 100 किलोमीटर प्रतितास वेगानं धावचे असा दावा करण्यात येत आहे. 

लाँच होण्यापूर्वीच वाढली किंमत 
प्रथम ही कार 3 जूनला लाँच होणार होती. पण, त्यानंतर वितरणामध्ये काही अडचणी असल्यामुळं ती आता लाँच करण्यात आली आहे. लाँच होण्यापूर्वीच या कारचे दर वाढवण्यात आले. सोबतच इतरही काही मॉडेल्सची किंमत कंपनीनं वाढवली आहे. इलेक्ट्रिक 4-डोर टेस्ला मॉडेल एस प्लेडचं वितरण शुक्रवारपासून सुरु करण्यात आली. टेस्ला प्रमुख एलन मस्क यांनीच यासंदर्भातील माहिती दिली. 

वेग म्हणजे वाराच जणू…. 
Tesla Model S Plaid मध्ये तीन इलेक्ट्रीक मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळं 1020 हॉर्सपॉवर जनरेट होते. ही कार दोन सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी प्रतितास इतका वेग पकडते. मस्क यांच्या माहितीनुसार ही कार पोर्शहून वेगवान आणि वॉल्वोहून जास्त सुरक्षित आहे. या कारचा हायस्पीड 321 किमी प्रतितास इतका आहे. 

OnePlus Nord CE Launched : बहुप्रतीक्षित OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च; प्री-बुकिंग केल्यास खास डिस्काउंट

गुणवैशिष्ट्य 
Tesla Model S Plaid मध्ये कंपनीकडून 19 इंचांची चाकं देण्यात आली आहेत. यामध्ये ग्राहक 21 इंच चाकांचाही पर्याय निवडू शकतात. सिंगल चार्जमध्ये ही वेगवान कार 627 किमीचं अॅव्हरेज देते. कंपनीनं दावा केल्यानुसार कारचे सुपरचार्जर्स अवघ्या 15 मिनिटांत तिला 300 किमी प्रवासासाठी तयार करतात. 

Tesla Model S Plaid या कारच्या स्पर्धेसाठी Porsche, Mercedes-Benz आणि Lucid Motors या लक्झरी कारही सज्ज आहेत. या कारही त्यांच्या वेगामुळंच ओळखल्या जातात. त्यामुळं आता कारप्रेमी नेमकी कोणाला पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment