Web Exclusives | लॉकडाउन झालं तर आर्थिक दिवाळखोरी होईल, टेक्स्टाईल व्यावसायिक चिंतेत

Share Now To Friends!!

<p>सोलापूरची ओळख ज्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमुळे आहे, त्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीची अवस्था आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सोलापुरात हजारो कामगार याच टेक्स्टाईल इंडस्ट्रीवर निर्भर आहेत. मागच्या लॉकडाउनमध्येही संपूर्ण इंडस्ट्री डबगाईला आली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान टेक्स्टाईल इंडस्ट्रीचे झाले. आता जर पुन्हा लॉकडाउन झालं तर व्यावसायिकांची आर्थिक दिवाळखोरी होईल असे मत टेक्स्टाईल व्यावसायिक करत आहेत. टेक्स्टाईल इंडस्ट्रीची हीच स्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो सोलापुरातील राठी टेक्सटाईल येथे. राठी टेक्स्टाईलमध्ये बुधवार सुट्टी असताना देखील रामकृष्ण गुंड कामावर आले आहेत. रात्री नाईट शिफ्ट केली असताना पुन्हा दुसऱ्या दिवशी दुपारी कामावर. कारण एकच लॉकडाउनची भीती. लॉकडाउन कधी होईल याची भीती मनात आहे. आता जर लॉकडाउन झालं तर परिवाराचं प्रपंच कसा चालवायचा या चिंतेने दिवस रात्र रामकृष्ण गुंड काम करतायत. तर मागील वर्षात तब्बल 44 टक्के व्यवसायात नुकसान झाल्याचे मत व्यवसायिक राजू राठी यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता लॉकडाउन नको अशी भावना टेक्स्टाईल इंडस्ट्रीतील ही मंडळी करतायत.</p>

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment