Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोन 22 जूनला भारतात लॉन्च होणार; फोनमधील फीचर्स?

Share Now To Friends!!

स्मार्टफोन निर्मात कंपनी शाओमी (Xiaomi) लवकरच आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. शाओमी कंपनी 22 जून रोजी भारतीय बाजारात Mi 11 Lite बाजारात आणणार आहे. हा आतापर्यंतचा कंपनीचा सर्वात पातळ आणि हलका फोन मानला जात आहे. कंपनीने हा फोन यावर्षी मार्चमध्ये जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. त्याचबरोबर हा फोन भारतात एन्ट्री करण्यापूर्वी त्याची काही स्पेसिफिकेशन्स समोर आली आहेत. 

स्पेसिफेकेशन्स

Mi 11 Lite स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच यात 90 Hzचा रिफ्रेश रेट असून गोरिला ग्लास 5 चे संरक्षण आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसरसह सुसज्ज असेल. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत संचयन दिले जाईल. हा फोन 4 जी आणि 5 जी दोन्ही प्रकारांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल सांगायचं तर,  Mi 11 Lite फोनमध्ये ट्रिपल रिअल कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेल असेल. 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सल टेलिफोटो-मॅक्रो लेन्स दिले जातील. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

पॉवर आणि कनेक्टिव्हिटी

पॉवरसाठी फोनमध्ये 4250mAh ची बॅटरी देण्यात येणार आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते. या फोनमध्ये साइड माउंटेड केलेले फिंगरप्रिंट सेन्सर आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स सारखे उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस आणि यूएसबी सारखी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात.

OnePlus Nord CE 5G शी स्पर्धा

Xiaomi Mi 11 Lite भारतात OnePlus Nord CE 5G शी स्पर्धा करेल. या फोनमध्ये 6.43 इंचाचा फ्लॅट डिस्प्ले, ग्लॉसी प्लास्टिक रिअर पॅनेल, मेटल फ्रेम आणि जाड बेझल दिले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, फिंगरप्रिंट स्कॅनर देखील बाजूला दिले जाऊ शकते. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा, यूएसबी-टाईप सी पोर्ट आणि 3.5 mm हेडफोन जॅक सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज असू शकते. फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Source link


Share Now To Friends!!

Leave a Comment